Hardik Pandya’s captaincy at Mumbai Indians has sparked fresh debate
esakal
Why Rohit Sharma should captain Mumbai Indians again? मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या आणखी एका पर्वात निराशाजनक कामगिरीने निरोप घ्यावा लागला आहे. हार्दिक पांड्याने MI ची सूत्रे हाती घेतल्यापासून संघाची कामगिरी खालावत चालली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फ्रँचायझीने २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून हार्दिकला ट्रेड केले आणि नंतर ३२ वर्षीय खेळाडूच्या हाती संघाची सूत्रे सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खालावली आहे. या काळात संघातील वातावरणही बिघडल्याची चर्चा सुरू झाली आणि ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होत आहे.