Hardik Pandya : पंजाब किंग्सकडे जाताच हार्दिकची भन्नाट पोस्ट... सर्वांची बोलती केली बंद; असं काय लिहिलंय त्याने?

Hardik Pandya first Instagram post after joining Punjab Kings: आयपीएल २०२७ पूर्वी झालेल्या मोठ्या ट्रेडनंतर हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्समध्ये आलेल्या हार्दिकच्या एन्ट्रीनंतर संघाच्या कर्णधारपदाबाबत चर्चा रंगली होती.
Hardik Pandya first Instagram post after joining Punjab Kings

Hardik Pandya first Instagram post after joining Punjab Kings

esakal

Updated on: 

Hardik Pandya Punjab Kings jersey Instagram photo: हार्दिक पांड्या इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आयपीएल २०२७ हंगामापूर्वी त्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. पण, मुंबई इंडियन्सचा हा माजी कर्णधार पंजाबचेही नेतृत्व करेल का, हा प्रश्न होता. पण, हार्दिकने आपण संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर पीबीकेएसच्या जर्सीमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये 'माझा कर्णधार. श्रेयस' असे लिहून संघाच्या नेतृत्वाच्या भविष्याबद्दलच्या सर्व शंका दूर केल्या.

Loading content, please wait...