Hardik Pandya hugs Ravi Bishnoi moments after getting out
esakal
Ravi Bishnoi dismisses Hardik Pandya video full clip : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाने भारतीय चाहते आनंदित झाले आहेत. दुखापतीतून बराचवेळ मैदानाबाहेर असलेल्या हार्दिकने पुनरागमनाच्या लढतीत आक्रमक फटकेबाजी केली. पण, त्याला दुसऱ्या सामन्यात अपयशाचा सामना करावा लागला. हैदराबाद जिमखाना येथे खेळवल्या गेलेल्या लढतीत बडोद्याच्या हार्दिकला गुजरातच्या रवी बिश्नोईने बाद केले. त्यानंतर रवी त्याचं नेहमीचं सेलिब्रेशन करत होता आणि त्याचवेळी हार्दिककडून अनपेक्षित कृती घडली..