

Hardik Pandya
sakal
Hardik Pandya likely to return to cricket in IPL 2027: हार्दिक पांड्याची दुखापत, हे एक कोडं बनलं आहे. एखाद्या मालिकेपूर्वी त्याची निवड होते आणि लगेचच दुखापतीमुळे त्याला माघारही घ्यावी लागते. न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेतून त्याचे पुनरागमन अपेक्षित होते. पण, त्याला नवीन दुखापत झाली अन् संघात त्याची निवडच केली गेली नाही. तो सध्या बीसीसीआयच्या क्रिकेट ऑफ एक्सलन्स ( CoE) मध्ये दुखापतीवर उपचार घेतोय आणि सावरण्यासाठी मेहनत घेतोय. पण, आता हार्दिकचे पुनरागमन हे थेट इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मधूनच होईल, असे वृत्त हाती आले आहे.