Hardik Pandya Reaction : माझ्याकडे बोलण्यासारखे फार काही नाही! हार्दिक हताश, निराश, हतबल... म्हणतो, आता कठोर निर्णय...

Hardik Pandya post match reaction MI vs PBKS IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या स्पष्टपणे निराश आणि हतबल दिसला. सामन्यानंतर बोलताना त्याने प्रामाणिकपणे कबूल केलं की, “सध्या माझ्याकडे बोलण्यासारखं फार काही नाही.”
Hardik Pandya post match reaction MI vs PBKS IPL 2026

Hardik Pandya post match reaction MI vs PBKS IPL 2026

esakal

Updated on

what Hardik Pandya said after Mumbai Indians loss? मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्संने सर्व आघड्यांवर मुंबई इंडियन्सला चीतपट केले. मुंबईला ६ बाद १९५ धावांवर रोखल्यानंतर पंजाबने १६.३ षटकांत ३ बाद १९८ धावा करत विजय मिळवला. क्विंटन डी कॉकची नाबाद ११२ धावांची खेळी व्यर्थ गेली. नमन धीरनेही ५० धावा केल्या. त्याता PBKS कडून प्रभसिमरन सिंग ( नाबाद ८०) व श्रेयस अय्यर ( ६६) यांनी सडेतोड उत्तर दिले. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या निराश दिसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com