MUMBAI INDIANS IPL 2027 RETENTION AND RELEASE STRATEGY
esakal
Mumbai Indians IPL 2027 retention and release strategy : इंडियन प्रीमिअर लीगची ट्रॉफी, पाचवेळा उंचावणारा मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा कधी जेतेपद पटकावेल? हा प्रश्न सध्या चाहत्यांना सतावतोय.. २०२४ मध्ये हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून संघात आणले आणि रोहित शर्माला हटवून कर्णधारपदही दिले. पण, मागील तीन पर्वात MI ला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे IPL 2027 पूर्वी संघात काही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कर्णधार हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) मुंबईला सोडून दुसऱ्या संघाच्या शोधात आहे. पण, फ्रँचायझीच्या रिलीज करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिक, हेच एकमेव नाही नाही. माजी विजेते सध्याच्या संघातील पाच खेळाडूंना करारमुक्त करू शकतात, अशी चर्चा आहे.