Hardik Pandya Reaction : या पर्वात आमच्याकडे जास्त पर्यायच नाही, मी गोलंदाजांना धावत्या बसमधून...! हार्दिक हे काय म्हणाला?

Hardik Pandya reaction after MI vs SRH match loss in IPL 2026 : मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ हंगाम अत्यंत कठीण ठरत आहे. वानखेडे स्टेडियमवर सलग चार सामने गमावण्याची नामुष्की MI वर प्रथमच ओढवली आहे. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या याने प्रामाणिक प्रतिक्रिया दिली.
MI vs SRH match loss reaction Hardik Pandya full quote

MI vs SRH match loss reaction Hardik Pandya full quote

esakal

Updated on

SRH chase 243 vs Mumbai Indians full match analysis: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीगमधील त्यांचा दुसरा सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात २४३ धावांचा डोंगर उभा केला. SRH हे लक्ष्य १८.४ षटकांत ४ बाद २४९ धावा करून दणदणीत विजयाची नोंद केली. हैदराबादने हा विजय मिळवून आयपीएल गुणतालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. रायन रिकेल्टनच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीला हैदराबादच्या चार फलंदाजांनी मिळून उत्तर दिले आणि सामना सहज खेचून नेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com