Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या येण्याने पंजाब किंग्स मजबूत; रिकी पॉन्टिंग म्हणाले, 'आता प्रत्येक विभागात पर्याय'

Hardik Pandya's Arrival Strengthens Punjab Kings: आयपीएल २०२७ पूर्वी पंजाब किंग्सने हार्दिक पांड्याला ट्रेडच्या माध्यमातून संघात घेतलं आहे. रिकी पॉन्टिंग यांच्या मते हार्दिकच्या येण्याने संघ अधिक मजबूत झाला असून, आता फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Hardik Pandya's Arrival Strengthens Punjab Kings

Hardik Pandya's Arrival Strengthens Punjab Kings

esakal

Updated on: 

Hardik Pandya's Arrival Strengthens Punjab Kings: आयपीएल २०२७ च्या तयारीला सुरुवात झाली असून, संघबांधणीसाठी फ्रँचायझींकडून खेळाडूंची अदलाबदल केली जात आहे. याचदरम्यान हार्दिक पांड्याचा पंजाब किंग्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

हार्दिकच्या येण्याने संघातील अनेक कमतरता दूर झाल्या असून, पंजाब किंग्स आता अधिक संतुलित संघ बनला आहे, असं संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी म्हटलं आहे. हार्दिकच्या समावेशामुळे संघात अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय वाढले असून, आगामी हंगामात त्याचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...