Hardik Pandya faces tough questions from Aakash Chopra
esakal
Hardik Pandya Criticised Over Poor IPL 2026 Form: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये हार्दिक पांड्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि त्याच्या नेतृ्त्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघही गुणतालिकेत तळाशी आहे. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा हार्दिक, आयपीएलच्या या पर्वात फलंदाजी आणि गोलंदाजीत काहीच कमाल दाखवू शकलेला नाही. नेतृत्व कौशल्यही सुमार दिसतेय. जसप्रीत बुमराहसारखा मॅचविनर गोलंदाज असूनही त्याचा योग्य उपयोग हार्दिकला करून घेता येत नाहीए. त्यावरूनच कोलकाता नाइट रायडर्सचा माजी खेळाडू आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याने हार्दिकवर बोचरी टीका केली आहे.