IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

Hardik Pandya flying kiss viral celebration T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सामन्यात हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन जबरदस्त षटकार ठोकत त्याने सामना रंगतदार केला आणि अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून नाट्यमय पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मैदानात उपस्थित चाहत्यांनी जल्लोष केला, तर ड्रेसिंग रूममध्येही आनंदाचे वातावरण होते.
Hardik Pandya flying kiss viral celebration T20 World Cup

Hardik Pandya flying kiss viral celebration T20 World Cup

esakal

Updated on

Hardik Pandya emotional celebration Chennai match: भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाचा सर्व राग आज बिचाऱ्या झिम्बाब्वे संघावर काढला. अभिषेक शर्मापाठोपाठ हार्दिक पांड्याने या सामन्यात अर्धशतक झळकावले. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभ्या केल्या. हार्दिकने शेवटच्या दोन चेंडूंत दोन षटकार खेचून २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर ड्रेसिंगच्या सहकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका शर्मा ( Mahieka Sharma) हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित होती आणि तिलाही हार्दिकच्या अर्धशतकाचा खूप आनंद झाला. हार्दिकनेही तिच्याकडे पाहून फ्लाइंग किस दिले.. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया गाजवतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com