5 Reasons Behind Mumbai Indians’ 4th Straight Defeat In IPL 2026
esakal
Mumbai Indians Collapse Again! 5 Key Reasons Behind Their Defeat vs PBKS: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी पंजाब किंग्सकडून दारूण पराभव पत्करावा लागला. पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला.. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने मुंबईवर आधीच दडपण होते, परंतु क्विंटन डी कॉकने त्याची उणीव जाणवू दिली नाही. क्विंटनच्या शतकाने संघाला १९६ धावांपर्यंत पोहोचवले, परंतु ते २०-२५ धावांनी कमी पडले. त्यानंतर गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणातही त्यांना अपयश आले. पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवामागची कारणं जाणून घेऊयात..