

Haris Rauf vs Will Jacks
esakal
Haris Rauf vs Will Jacks: पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका या तीन संघांमध्ये तिरंगी वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात मैदानावर मोठा वाद पाहायला मिळाला.
पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रऊफ आणि इंग्लंडचा विल जॅक्स यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोघांमधील वाद वाढत असल्याचं पाहून इंग्लंडचा जो रूट आणि मैदानावरील पंचांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर एका विकेटने थरारक विजय मिळवला.