ICC Womens World Cup : ३३० धावा करूनही हरल्या, स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट... कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले खापर?

Harmanpreet Kaur reaction after India collapse : भारतीय महिला क्रिकेट संघाने तब्बल ३३० धावा केल्या, तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना गमावला आणि वर्ल्डकप स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
HARMANPREET KAUR UPSET

HARMANPREET KAUR UPSET

Updated on

India vs Australia Women’s World Cup 2025 highlights: भारतीय महिला संघाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने ३३१ धावांच्या लक्ष्याचा ३ विकेट्स राखून पाठलाग करून गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. त्याचवेळी भारत सलग दोन पराभवामुळे तिसऱ्या स्थानावर अडकला आहे आणि आता आगामी सामन्यांत इंग्लंड व न्यूझीलंड सारख्या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना त्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे यजमान भारत उपांत्य फेरीत पोहोचल की नाही अशी शंका आहे. अशात कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur Reaction ) कालच्या पराभवाचं खापर खालच्या क्रमांकावरील फलंदाजांवर फोडलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com