

HARMANPREET KAUR
esakal
Harmanpreet Kaur Record: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज वडोदरा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने चांगली फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर मोठं लक्ष्य ठेवलं आहे. भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी या सामन्यात शतके झळकावली आहेत.
कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत कौरचं हे पहिलं वनडे शतक आहे. भारतीय संघाने सुरुवातीला लवकर विकेट्स गमावल्या असताना हरमनप्रीत आणि दीप्ती या दोघींनीही महत्त्वाची भूमिका बजावत संघाचा डाव सावरला.