
मुंबई इंडियन्स संघाने शनिवारी झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स संघावर आठ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि महिला प्रीमियर लीगच्या जेतेपदावर दुसऱ्यांदा मोहोर उमटवली.
हरमनप्रीत कौर हिने अंतिम फेरीतील विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले. ती म्हणाली की आम्ही १४९ धावा केल्या होत्या, मात्र आमच्या गोलंदाजांनी १५० धावांचे आव्हान जणू काही १८० धावांचे आहे अशाप्रकारे प्रभावी गोलंदाजी केली. त्यामुळे आमचा विजय शक्य झाला.