
वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने ८ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. मुंबई इंडियन्सच्या या विजयानंतर त्यांच्या संघाने मोठा जल्लोष केला.