Mumbai Indians qualification scenario WPL 2026
esakal
Mumbai Indians qualification scenario WPL 2026 : गुजरात जायंट्सने वडोदरा येथे शुक्रवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर ११ धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवत महिला प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. अॅश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील संघाने साखळी फेरी १० गुणांसह संपवली आणि WPL 2026 पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान निश्चित आहे. मुंबई इंडियन्सने यापूर्वी जायंट्सविरुद्ध सर्व ८ लढती जिंकल्या होत्या, परंतु यावेळी जायंट्सने कमाल केली. जायंट्सविरुद्धचा मुंबई इंडियन्सचा पराभव झाला असला तरी, अजूनही WPL 2026 प्लेऑफच्या शर्यतीत ते आहेत. पण, त्यांचे भवितव्य आता त्यांच्या हातात नाही.