
हेडिंग्ले येथे होत असलेल्या कसोटी सामन्यात भारताला पहिल्या डावात इंग्लंडने चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसले आहे. यात ऑली पोप आणि हॅरी ब्रुकचे योगदान मोठे राहिले. दरम्यान, इंग्लंडच्या डावात अनेक नाट्यमय घटनाही घडल्या. जसप्रीत बुमराहच्याच गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने तब्बल ३ झेलही सोडले.