
Harry Brook Test Record Against New Zealand: न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिकेत इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रुकने विक्रमी कामगिरी केली. न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने दमदार शतक ठोकले. या कसोटी मालिकेतील त्याचे हे दुसरे शतक आहे, पहिल्या सामन्यातही त्याने दिडशतकी खेळी केली आहे. त्याने यावेळी परदेशातील सातवे शतक ठोकले व न्यूझीलंडविरूद्ध सलग दुसरे शतक ठोकले. या शतकासह तो एखाद्या देशात शंभरहून अधिक सरासरीने फलंदाजी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
त्याने न्यूझीलंडविरूद्ध एकूण ६ डावात १०३.८३ च्या सरासरीने ६२३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३ शतकांचा व २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर २५ वर्षिय फलंदाज हॅरी ब्रुक इंग्लंडसाठी जलद २००० कसोटी धावा (२२ सामन्यात) करणारा खेळाडू बनला आहे.