
India vs Australia 2nd Test : मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेताना Pink Ball कसोटीत भारताचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळला. लोकेश राहुल ( ३७) व शुभमन गिल ( ३१) यांच्यानंतर भारताच्या स्टार खेळाडूंना फार चांगली कामगिरी करता आली नाही. नितीश कुमार रेड्डी ( Nitish Kumar Reddy ) मैदानावर उभा राहिला नसता तर भारताच्या एवढ्याही धावा झाल्या नसत्या. त्यात ऋषभ पंतच्या अति उत्साहाने भारताच्या हातून एक विकेट निसटली.