

Team India
Sakal
IND vs ENG 3rd ODI news: भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता रविवारी (१९ जुलै) होणार आहे. रविवारी लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध भारत असा वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना होईल. हा सामना मालिकेतील निर्णायक सामना असणार आहे.
कारण पहिल्या सामन्यात भारताने, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झालेली आहे. पण आता शेवटच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला महत्त्वाचा बदल संघात करावा लागला आहे.