ENG vs IND: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचा 'हा' खेळाडू मायदेशी परतणार! संघातून केलं रिलीज

England vs India, 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला अखेरच्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला. आता दुसऱ्या सामन्याआधी एका खेळाडूला भारतीय संघातून मुक्त करण्यात आले आहे.
Yashasvi Jaiswal - Harshit Rana
Yashasvi Jaiswal - Harshit RanaSakal
Updated on

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर तेंडुलकर-अँडरस ट्रॉफी खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला हेडिंग्लेमध्ये पाचव्या दिवसाच्या शेवटच्या दिवशी पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे इंग्लंडने ५ विकेट्सने मिळवलेल्या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या सामन्यात भारताकडून ५ शतके झाली होती. पण त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी इतिहासात ५ शतकांनंतरही पराभूत होणारा भारत पहिलाच संघ ठरला. अशातच आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असून एका खेळाडूला पुन्हा मायदेशी परतावे लागणार आहे.

Yashasvi Jaiswal - Harshit Rana
IND vs ENG 1st Test: जसप्रीत बुमराहला पाचही कसोटीत खेळवणार नाही! गौतम गंभीर म्हणतो, आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com