
IPL 2025 Auction: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा लिलावात देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंना मोठ्या रकमेच्या बोली लागल्या आहेत. २४ आणि २५ नोव्हेंबर असे दोन दिवस हा लिलाव झाला.
या लिलावात हरियानाचा अष्टपैलू अंशुल कंबोज यालाही कोट्यवधि रुपयांची बोली लागली आहे. दरम्यान, त्याला मिळालेल्या बोलीचे सेलीब्रेशन बसमध्ये त्याच्या हरियानातील संघसहकाऱ्यांनी जोरदार केले.