
IPL Auction Biggest Salary Hike: इंडियन प्रीमियर लीग एक अशा स्पर्धांपैकी आहे, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू सहभागी होतात. देशातील अनेक भागातून खेळाडू लिलावासाठी नाव नोंदवतात, ज्यातील मोजक्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी मिळते.
खरंतर आयपीएलमध्ये बऱ्याचदा असंही दिसून आलं आहे की अनेक खेळाडू एका रात्रीत करोडपती होतात. आयपीएल २०२५ लिलावातही असे दिसून आले.
आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव नुकताच २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला. हा लिलाव विक्रमी ठरला. या लिलावात १८२ खेळाडूंना खरेदीसाठी फ्रँचायझींनी एकूण ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले.