
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसमोरील अडचणी सध्या वाढलेल्या दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिलाय.
उच्च न्यायालयानं शमीला पत्नी हसीन जहाँ आणि मुलगी आयरा यांना दरमहा चार लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये १.५ लाख हसीन जहाँला, तर २.५ लाख मुलगी आयराला देण्याचे आदेश आहेत. यानंतर हसीन जहाँने केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.