West Indies fail to chase in required time for World Cup qualification
वेस्ट इंडिजच्या महिला संघाला भारतात या वर्षी होणाऱ्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करण्यासाठी १०.१ षटकांत १६७ धावांचे लक्ष्य पार करायचे होते. थायलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी जबरदस्त जोर लावलाही.. पण, १०.१ षटकाऐवजी त्यांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी १०.५ षटकं खेळावी लागली अन् त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले. प्रयत्न करूनही थोडक्यात हुकलेल्या संधीमुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले.