

India Test Team
Sakal
Rain Threatens Team India's 3-Day Practice Game in Colombo : भारतीय संघ आज (४ ऑगस्ट) श्रीलंकेतच पोहचणार आहे. भारताला या दौऱ्यात १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्याआधी भारतीय संघ सराव सामनाही खेळणार आहे.
खरंतर काही महिन्यांपूर्वीच सराव सामना महत्त्वाचा असल्याचे भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने म्हटले होते. त्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळण्यापूर्वी तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. मात्र हा सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.