IND vs NZ, 1st Test: हा काय मुर्खपणा.... शतकवीर निकोल्सलची विकेट मिळाली होती, रिषभ पंत- पडिक्कलमध्ये गोंधळ अन् सुटला सोपा झेल

Missed Catch Gives Centurion Henry Nicholls a Crucial Lifeline: ३५ वर्षीय फलंदाज हेन्री निकोल्स भारताविरुद्ध न्यूझीलंडसाठी संकटमोचक बनला आहे. कर्णधार लॅथम बाद झाल्याने पहिल्याच षटकात तो फलंदाजीला उतरला आणि शतक ठोकत मोठा पराक्रम केला. शतकानंतर त्याला झेल सुटल्याने जीवदानही मिळाले.
 Henry Nicholls Dropped Catch  | India vs New Zealand 1st Test

Henry Nicholls Dropped Catch | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत हेन्री निकोल्सने कमालीचा खेळ करत शतक ठोकले आहे. या सामन्यात भारताने सुरुवात चांगली केली होती, पण निकोल्सने ग्लेन फिलिप्सला साथीला घेत न्यूझीलंडचा डाव सावरला. निकोल्स शतकानंतर झेल सुटल्याने जीवदानही मिळाले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडकडून कर्णधार टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे सलामीला फलंदाजला उतरले होते. पण लॅथम तिसऱ्याच चेंडूवर बाद झाल्याने हेन्री निकोल्सला (Henry Nicholls) पहिल्याच षटकात फलंदाजीला उतरावे लागले.

 Henry Nicholls Dropped Catch  | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: बुमराहचा वेलिंग्टन कसोटीत धुमाकूळ; भारताच्या टॉप-१० बॉलर्समध्ये एन्ट्री, जवागल श्रीनाथचा विक्रम मोडला
Loading content, please wait...