Suryakumar Yadav on Shreyas Iyer recovery progress
esakal
Suryakumar Yadav on Shreyas Iyer recovery progress: भारताच्या वन डे संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यर याच्या दुखापतीने सर्वांना चिंतीत केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात झेल पकडताना श्रेयस जमिनीवर जोरात आदळला आणि त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. तो बराच काळ मैदानावरच वेदनेने कळवळत राहिला आणि डॉक्टरांनी लगेच मैदानावर धाव घेत त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेले. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. काल त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे वृत्त आल्याने चिंता आणखी वाढली. त्यात त्याच्या आई वडिलांना तातडीने व्हिसा बनवून ऑस्ट्रेलियात बोलावण्याच्या हालचालीही सुरू होत्या.