World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

India breaks Australia ICC winning streak record: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने Ricky Pontingच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.
India scripts history with 16 consecutive wins in ICC events, breaking Ricky Ponting’s Australia record

India scripts history with 16 consecutive wins in ICC events 

esakal

Updated on

India unbeaten run T20 World Cup 2024- Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानला पराभूत करून क्रिकेट इतिहासात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अ गटातील सामन्यात पाकिस्तानवर ६१ धावांनी विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. रोहित शर्माने २०२४ चे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आणि त्याने विजयाचा धडाका लावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com