England record biggest ever ODI win against South Africa
esakal
इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर ३४२ धावांनी विजय मिळवून भारताचा विश्वविक्रम मोडला.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ४१४ धावा केल्या, जो त्यांचा द. आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्तम स्कोर आहे.
जो रूट (१००) आणि जेकब बेथेल (११०) यांनी शतकं ठोकली, तर बटलर व स्मिथने अर्धशतकं झळकावली.
India’s world record broken as England create ODI history : इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. रविवारी साऊथहॅम्प्टन येथे झालेल्या लढतीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर ३४२ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी हा विश्वविक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. भारताने २०२३ मध्ये तिरुअनंतपूरम येथे श्रीलंकेवर ३१७ धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५ बाद ४१४ धावा केल्या आणि त्यात जो रूट व जेकब बेथेल यांच्या शतकांचा समावेश होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संपूर्ण संघ २०.५ षटकांत ७२ धावांत गार झाला.