Hong Kong Sixes UAE vs Pakistan match highlights
esakal
Scotland beat Bangladesh with last-ball six in Hong Kong Sixes: भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी पाकिस्तानला दुबळ्या यूएईने झटका दिला. हाँग काँग सिक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात संयुक्त अरब अमिरातीने शेवटच्या सहा चेंडूंत गतविजेत्या पाकिस्तानचा अहंकार मोडला. विजयासाठी २१ धावांची गरज असताना एक विकेट त्यांनी गमावली, परंतु पाच चेंडूत तुफान फटकेबाजी करून मॅच जिंकली. याच स्पर्धेत स्कॉटलंडने शेवटच्या चेंडूवर षटकाराने बांगलादेशला हार मानन्यास भाग पाडून दिवसाचा दुसरा धक्कादायक निकाल नोंदवला.