
Champions Trophy 2025: Afghanistan’s Win Over England: अफगाणिस्तान संघाने पुन्हा एकदा इंग्लंडला आयसीसी स्पर्धेमध्ये पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अफगाणिस्तानने बुधवारी इंग्लंडवर विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या. मात्र, इंग्लंडला या स्पर्धेतून बाहेर फेकले. अ गटातून भारत व न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. पण, आता अफगाणिस्तानच्या विजयाने ब गटातील चुरस वाढली आहे.