Pakistan Women’s team faces semifinal elimination risk
esakal
Pakistan women semifinal qualification scenario World Cup 2025 : पाकिस्तानच्या महिला संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने बुधवारी झालेल्या लढतीत पाकिस्तानवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि Point Table मध्ये ५ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. सलग तीन पराभवांमुळे पाकिस्तान महिला संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची चिन्हे तयार झाली आहेत. पण, आता त्यांना टीम इंडियाच वाचवू शकते आणि त्यासाठी शेजारी हाता पाया पडले, तर नवल वाटायला नको.