
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) कारवाईला सुरुवात केली आहे. संघाच्या कामगिरीवर नाराज झालेल्या BCCI ने सपोर्ट स्टाफमधील तीन सदस्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहेत. या तीन सदस्यांमध्ये सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याचाही समावेश आहे. त्याचं नाव ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या नायरला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियात घेऊन आला. त्यालाच दूर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबईचा दिग्गज क्रिकेटपटू राहिलेल्या अभिषेक नायरने प्रशिक्षण क्षेत्रात त्याची वेगळी ओळख निर्माण केली.