

Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
How much money Virat, Rohit earns in Vijay Hazare Trophy : विराट कोहली व रोहित शर्मा हे दोन स्टार फलंदाज उद्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर हे दोन्ही दिग्गज देशांतर्गत क्रिकेटमधील वन डे स्पर्धेत खेळणार आहे आणि त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान टिकवता यावे आणि फिटनेस कायम राहावा, यासाठी या दोघांनी VHT मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. पण, या स्पर्धेतील दोन सामने खेळून त्यांना मॅच फी म्हणून किती रक्कम मिळणार आहे, माहित्येय?