

Rohit Sharma emotional interview on World Cup heartbreak : काही पराभव हे केवळ धावफलकापुरते मर्यादित राहत नाहीत, तर काळजात खोलवर जखम करणारे असतात... १९ नोव्हेंबर २०२३ ही तारीख भारतीय क्रिकेटला अशीच जखम देणारी आहे... २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित मालिका कायम राखून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता. हा वर्ल्ड कप आपलाच असे सर्वांनाच वाटले होते, परंतु चिवट ऑस्ट्रेलियन संघाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. हा पराभव रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) प्रचंड जिव्हारी लागला आणि त्याने त्याचवेळी क्रिकेट सोडून देण्याचा विचार केला होता...