Rohit Sharma has finally explained the viral moment with Sanju Samson
esakal
Rohit Sharma ICC interview about Sanju Samson opportunity: 'दुःखी होऊ नकोस, ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि तुला केव्हाही संधी मिळू शकते,'रोहित शर्माने यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला दिलेला हा सल्ला अन् त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो वा मरो सामन्यात मिळालेली संधी... त्या संधीचं सोनं करताना संजूने नाबाद ९७ धावांची खेळी करून संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले आणि इंग्लंडविरुद्ध ८९ धावांची खेळी करून संघाला फायनलमध्ये तो घेऊन आलाय... रोहित व संजूचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. आता रोहितने त्या सल्ल्यामागचं कारणही सांगितलं आहे.