Dhanashree Verma’s Hits Back At Troll
esakal
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट फेब्रुवारी २०२५ मध्ये झाला.
घटस्फोटानंतर धनश्रीवर "गोल्ड डिगर" असल्याचे आरोप करत तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले.
धनश्री काही काळ सोशल मीडियापासून दूर राहिली, तर चहलने अनेक पॉडकास्टमध्ये नात्याबद्दल मत मांडले.
Why did Yuzvendra Chahal and Dhanashree Verma divorce? भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर धनश्री वर्माला प्रचंड ट्रोलचा सामना करावा लागला. नृत्यदिग्दर्शक असलेली धनश्री त्यानंतर बराच काळ सोशल मीडियापासून दूर होती आणि त्याकाळात चहल अनेक पॉडकास्टवर त्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल भाष्य करत सुटलेला. आता धनश्रीनेही त्याला उत्तर देण्यास सुरूवात केली आहे आणि तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.