David Warner speaks out after Ahmedabad plane tragedy : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या या इमारतीवर कोसळलं तिथेही अनेकांचा मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की प्रचंड मोठा स्फोट होऊन अक्षरश: विमानातील काहीच शिल्लक राहिले नाही. या अपघातानंतर जगभरातून अनेकांनी शोक व्यक्त केला. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकरसह अनेकांनी अपघतातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. पण, आज ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.