ICC Bans Cricketer: ICC ची मोठी कारवाई! अमेरिकेच्या ‘या’ क्रिकेटपटूवर तब्बल ८ वर्षांची बंदी; नेमकं काय केलं?

ICC Takes Strict Action Against Akhilesh Reddy: अमेरिकेचा क्रिकेटपटू अखिलेश रेड्डीवर ICC ने ८ वर्षांची बंदी घातली आहे. अबू धाबी T10 लीगदरम्यान मॅच फिक्सिंगचा प्रयत्न आणि तपासात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
USA cricketer banned by ICC

ICC bans USA Akhilesh Reddy for 8 years

esakal

Updated on

ICC Takes Strict Action Against Akhilesh Reddy: क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकेचा क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी याच्यावर तब्बल ८ वर्षांची बंदी घातली आहे. भारतातील हैदराबादमध्ये वाढलेल्या या २६ वर्षीय खेळाडूने अमेरिकेसाठी ४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

याशिवाय तो सनरायझर्स हैदराबादचा(SRH) नेट गोलंदाजही राहिला असून विजय हजारे ट्रॉफीतही त्याचा समावेश झाला होता. मात्र आता गंभीर आरोपांमुळे त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com