
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका या दोन देशात महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या तारखांची आणि ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार असून भारत आणि श्रीलंकामधील ५ ठिकाणे सामन्यांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.