Women's T20 World Cup 2024 Team of the Tournamenesakal
Cricket
नाचक्की ! Women's T20 World Cup 2024 च्या संघात फक्त एक भारतीय; न्यूझीलंड, आफ्रिकेचे ६ खेळाडू
ICC Women's T20 World Cup 2024 - आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
ICC Womens T20 World Cup 2024 Team of the Tournament - न्यूझीलंडच्या महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर त्यांनी विजय मिळवला आणि आयसीसी स्पर्धेचे पहिले जेतेपद नावावर केले. आयसीसी या स्पर्धेतील सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ आज जाहीर केला. यामध्ये भारताच्या फक्त एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. विजेत्या न्यूझीलंड आणि उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघातील प्रत्येकी ३ खेळाडूंचा या संघात समावेश आहे. इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांचेही खेळाडू या संघात आहेत.

