
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून शुक्रवारपासून (२४ जानेवारी) २०२४ मधील पुरस्कारांची घोषणा करण्यात येत आहे. आयसीसीने शुक्रवारी आधी २०२४ मधील सर्वोत्तम वनडे पुरूष संघाची घोषणा केली, त्यानंतर त्यांनी सर्वोत्तम वनडे महिला संघाचीही घोषणा झाली आहे.
आयसीसीच्या सर्वोत्तम पुरुष वनडे संघात भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा संघांच्या एकाही खेळाडूला संधी मिळालेली नव्हती. मात्र, महिला वनडे संघाबाबत चित्र वेगळे दिसून आले आहे.