
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच २०२४ मधील पुरस्कारांची घोषणा केली असून हे पुरस्कार शुक्रवारपासून (२४ जानेवारी) घोषित केले जात आहेत. शुक्रवारी आयसीसीने २०२४ मधील सर्वोत्तम वनडे पुरुष संघाची घोषणा केली आहे. या संघात २०२४ मध्ये वनडेत चांगली कामगिरी केलेल्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.