ICC announces all-female umpire panel for Women’s World Cup 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी भारतात होणाऱ्या महिला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रथमच सर्व सामन्यांचे पंच आणि सामनाधिकारी पूर्णपणे महिला असतील अशी घोषणा केली. हा प्रयोग २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि दोन महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत यापूर्वी केला गेला असला तरी, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत हे पहिल्यांदाच घडणार आहे.