
भारतीय क्रिकेट चाहत्यांना यावर्षी मायदेशात वनडे वर्ल्ड कपचा थरार पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (१६ जून) महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे दोन संघही या स्पर्धेत आमने-सामने येणार आहे. काही दिवसांपूर्वीच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादाला भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले होते.
त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी चिघळले होते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध भारताने क्रिकेट खेळू नये असं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र, आता या स्पर्धेत हे दोन संघ ५ ऑक्टोबर रोजी आमने-सामने असणार आहेत.