

ICC’s Women’s World Cup 2025 Team
esakal
Harmanpreet Kaur misses out on ICC Women’s World Cup 2025 XI : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने महिला वर्ल्ड कप जिंकला असला तरी आयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघात तिला स्थान मिळालेले नाही. भारताने ५२ धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून पहिले वर्ल्ड कप जेतेपद पटकावले. पण, आयसीसीच्या संघाचे नेतृत्व आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलव्हार्डकडे ( LAURA WOLVAARDT AS CAPTAIN ) सोपवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या संघात भारताच्या तीन खेळाडूंनी आपली जागा पक्की केली आहे. त्याशिवाय उपविजेत्या आफ्रिकेच्या तीन खेळाडूंचाही समावेश आहे.