

South Africa - West Indies
Sakal
टी-२० विश्वकरंडक रविवारी आटोपला. मात्र, तरीही वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिका या दोन देशांतील क्रिकेटपटू अद्याप भारतातच आहेत. या दोन्ही देशांतील खेळाडूंसाठी विशेष विमान व्यवस्थेची सोय करण्यात आली होती, पण चार्टर विमान प्रकियेत काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते उड्डाण घेऊ शकले नाही.
त्यानंतर आयसीसीकडून (ICC) पुढाकार घेण्यात आला असून, आता दोन्ही देशांतील खेळाडूंसाठी वैयक्तिक विमान तिकिटाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.