

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सातवा सामना मंगळवारी रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. सामन्यातील नाणेफेकही झाली नाही.
त्याआधीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे बराचवेळ वाट पाहिल्यानंतर अखेर सामनाधिकाऱ्यांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना आता प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे.